प पू. समर्थ रामदास स्वामी आणि प. पू. श्रीधर
स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा (शाहू नगरी) येथील ‘समर्थ सदन’ मध्ये
दरवर्षी चातुर्मासानिमित्त्य विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामवंत कीर्तनकार, विद्वान प्रवचनकार,
व्याख्याते
आणि कलाकार आपली सेवा रुजू करण्यासाठी एकत्र येतात.
भक्ती आणि ज्ञानाचा हा जागर चातुर्मासाच्या संपूर्ण काळात अखंडपणे सुरू असतो.
दैनंदिन उपक्रम आणि धार्मिक विधी
पारंपारिक पद्धतीने गडावरील व सदनातील वातावरण मंगलमय ठेवण्यासाठी खालील धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात
-
सकाळी - सामूहिक नामस्मरण आणि ध्यान.
धार्मिक विधी - महापूजा, लघुरुद्र आणि अभिषेक.
बौद्धिक सेवा - नामवंत वक्त्यांची प्रवचने आणि व्याख्याने.
संत ज्ञानपीठ - एक अविरत प्रवास
'संत ज्ञानपीठाच्या' वतीने वर्षभर अशा अनेक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे नियोजन सातत्याने
केले जाते. विशेष म्हणजे, हे सर्व लोकोपयोगी कार्यक्रम पूर्णपणे लोकाश्रयावर (भक्तांच्या सहकार्यावर)
अवलंबून असतात.
आवाहन - भारतीय संस्कृती आणि समर्थांचा हा वारसा जपण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या
सांस्कृतिक कार्यास समर्थ भक्तांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, ही नम्र विनंती. आपल्या योगदानामुळेच हे
ज्ञानाचे कार्य अधिक जोमाने पुढे नेणे शक्य होईल.
आगामी कार्यक्रम
श्रीसमर्थ पादुका प्रचार दौरा
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय
जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.