१९२७ साली श्रीधर स्वामी सज्जनगडावर आले आणि समर्थांची सर्व प्रकारे सेवा करून, व साधना करून समर्थ कृपा संपादन केली. १९३० साली कर्नाटकात गेलेव तेथे समर्थ सांप्रदायाचा प्रसार केला. १९३५ साली ते पुन्हा गडावर आले तेव्हा दिनकर बुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा असे साधने करिता आलेले रामदासी त्यांच्या भोवती गोळा झाले. ही सर्व रामदासी मंडळी जमेल तशी समर्थ सेवा निस्पृहपणे करीत होती. त्यावेळी सज्जनगडावरील देवस्थानाची व्यवस्था समाधानकारक नव्हती, कारण इ.स. १९२८ सालापासून बापूसाहेब स्वामींनी पुत्रांतील कलहामुळे व संस्थानला कर्ज झाल्यामुळे संस्थानचा कारभार कोर्ट ऑफ वॉर्डस्कडे सोपविला होता. देवालयांचे व वास्तूंचे दैन्य अनेकांना विषण्ण करीत होते. त्यावेळी साधनेसाठी येऊन राहिलेले दिनकरबुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा, अण्णाबुवा असे अनेक रामदासी एकत्र येऊन १९३९ साली नानासाहेब देवांच्या प्रेरणेने सज्जनगडावर "समर्थ संघाची शाखानिर्माण झाली. या रामदासींना माध्यान्हीच्या जेवणाची सोय नव्हती.
अधिक माहितीसाठीश्रीकुलवृत्त, जन्म व बालपण (पहिली 12 वर्षे -इ. स. 1608 ते 1620) - श्री समर्थ रामदास स्वामींचे पूर्वज कृष्णाजीपंत ठोसर हे दुष्काळ व राज्यक्रांतीमुळे बेदर प्रांत सोडून शके 884 ( इ.स. 962) साली गोदावरीतीरी हिवरे येथे येऊन राहिले. यांना पांच पुत्र होते. शेवटचा पुत्र दशरथपंत याने कसबे जांब हे गांव वसविले व स्वपराक्रमाने बाजूच्या बारा गावांचे कुलकर्णीपद मिळविले. हे रामोपासक व वैराग्यशील होते. कृष्णाजीपंतांपासून श्री समर्थांचे वडील सूर्याजीपंत हे तेविसावे पुरुष, यांचा जन्म शके 1490 (इ.स. 1568) साली जांब गांवी झाला. हे सूर्याची व रामाची उपासना करीत. रामनवमी उत्सव करीत.यांची पत्नी राणूबाई सुशील, धर्माचरणतत्पर व वैराग्यशील पतिव्रता होती. या दोघांना सूर्याच्या कृपेने शके 1527, मार्गशीर्ष शुक्ल 3 (इ.स. 1605) या शुभदिनी प्रथम पुत्र झाला. त्याचे नांव गंगाधर ठेवले. हे गृहस्थाश्रमी होते. हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, गोत्र - जमदग्नी, सूत्र - आश्वलायन. श्रेष्ठ गंगाधर यांचे लग्न शके 1534 (इ.स. 1615) साली झाले. यांना प्रत्यक्ष रामाचा अनुग्रह होता. शके 1537 (इ.स. 1516) ला सूर्याजीपंत परंधामास गेल्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी श्रेष्ठांनी सांभाळली. ते गृहस्थाश्रमी असले तरी सत्वशील, सदाचारसंपन्न व भक्तिज्ञान वैराग्याने परिपूर्ण होते. यांचे भक्तिरहस्य व सुगमोपाय हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सूर्याजीपंतांच्या निधनानंतर श्रेष्ठ गंगाधरपंत लोकांना अनुग्रह देत असत. श्रेष्ठांच्या जन्मानंतर सूर्याजीपंतांना रामकृपेने शके 1530 - चैत्र शुक्ल 9 - रामनवमी (इ.स. 1608) या शुभमुहूर्तावर दुसरा पुत्र झाला. त्याचे नांव नारायण ठेवले. हे नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी.
अधिक माहितीसाठीनांदेड जिल्ह्यात देगलूर या नांवाचे गांव आहे. त्या ठिकाणी स्वामीजींचे वाडवडिल रहात होते. त्यांचे नांव पतकी व ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. स्वामीजींचे वडिल नारायणराव व त्यांचे वडिल बंधू गोविंदराव हे आपल्या चुलत्याकडेच लहानाचे मोठे झाले. त्यांना घरची सर्व कामे करावी लागत. तेथे अनेक प्रकारचे त्रास व अपमान सहन करावे लागत होते. त्यांनी कंटाळून ते घर सोडले व नशिबाची परिक्षा पहाण्यासाठी हैद्राबादला रवाना झाले. कालांतराने त्यांची व एका श्रीमंत गृहस्थाची गाठ पडली आणि लोभही जडत गेला. पुढे त्यांनी या दोघांचे विवाहही करुन दिले. गोविंदरावांना मूलबाळ झाले नाही, नारायणराव यांना रेणुका नांवाची कन्या झाली. त्यानंतर त्यांची पत्नी कालवश झाली. नारायणरावांनी पुन्हा दुसरा विवाह केला. या विवाहाने त्यांच्या जीवनात आमूलाग्र असे परिवर्तन घडून आले. दुसरी पत्नी कमलाबाई ह्या फारच देखण्या, प्रेमळ, सुदृढ, सुशील व कर्तव्यदक्ष होत्या. याच श्रीधरस्वामीजींच्या माता होत. सहज बोलताना स्वामीजींनी त्यांची तुलना राजा हरिश्चंद्राच्या तारामतीशी केली होती ! या एकाच दृष्टांतावरुन माताजी काय होत्या हे कळून येईल. त्रिंबक, गोविंद व गोदावरी ही श्रीधरस्वामीजींची वडिल भावंडे. गोविंद हे तिस-या वर्षी वारले.
अधिक माहितीसाठीश्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड येथे विविध उपक्रम राबविले जातात.
सेवा मंडळाच्या प्रकाशन विभागामुळे समर्थ चरित्र आणि तत्वज्ञानाचा दूरवर प्रसार झाला. नानासाहेब देवांनी सुरु केलेले हे महत्कार्य ‘श्री समर्थ सेवा मंडळ’ यथाशक्ती पुढे नेत आहे.
सज्जनगड मासिकाच्या नोव्हेंबर 1978 च्या अंकामध्ये पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमाचा पहिला लेख प्रसिद्ध करण्यात आला.
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.
श्री समर्थ रामदास स्वामी, माघ वद्य नवमी इ. स. १६८२ या दिवशी सज्जनगडावर
समाधीस्थ झाले; या दिवसाला 'दास नवमी' म्हणतात.
श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगडतर्फे विविध कार्यक्रम साजरे केले जातात.
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.
इथे क्लिक कराश्री समर्थ रामदास स्वामी, माघ वद्य नवमी इ. स. १६८२ या दिवशी सज्जनगडावर समाधीस्थ झाले; या दिवसाला 'दास नवमी' म्हणतात.
इथे क्लिक करा