१९२७ साली श्रीधर स्वामी सज्जनगडावर आले आणि समर्थांची सर्व प्रकारे सेवा करून, व साधना करून समर्थ कृपा संपादन केली. १९३० साली कर्नाटकात गेलेव तेथे समर्थ सांप्रदायाचा प्रसार केला. १९३५ साली ते पुन्हा गडावर आले तेव्हा दिनकर बुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा असे साधने करिता आलेले रामदासी त्यांच्या भोवती गोळा झाले. ही सर्व रामदासी मंडळी जमेल तशी समर्थ सेवा निस्पृहपणे करीत होती.
त्यावेळी सज्जनगडावरील देवस्थानाची व्यवस्था समाधानकारक नव्हती, कारण इ.स. १९२८ सालापासून बापूसाहेब स्वामींनी पुत्रांतील कलहामुळे व संस्थानला कर्ज झाल्यामुळे संस्थानचा कारभार कोर्ट ऑफ वॉर्डस्कडे सोपविला होता. देवालयांचे व वास्तूंचे दैन्य अनेकांना विषण्ण करीत होते. त्यावेळी साधनेसाठी येऊन राहिलेले दिनकरबुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा, अण्णाबुवा असे अनेक रामदासी एकत्र येऊन १९३९ साली नानासाहेब देवांच्या प्रेरणेने सज्जनगडावर "समर्थ संघाची शाखानिर्माण झाली. या रामदासींना माध्यान्हीच्या जेवणाची सोय नव्हती.
हे रामदासी एक-दोन दिवसांनी गडाखालील खेडेगावांमधून भिक्षा आणून स्वयंपाक करून समर्थांना नैवेद्य दाखवित असत. इ.स. १९४७-४८ च्या दरम्यान उद्योगपती समर्थभक्त बाबुराव वैद्य, सातारा हे गडावर आले व समर्थपूजेतील जीर्ण उपकरणे पाहून येथील जीर्णोद्धार करण्याचा त्यांनी संकल्प केला. येथील दिनकरबुवा वगैरे रामदासींना घेऊन विचार विनिमय केला व समर्थसेवेकरीता एक मंडळ निर्माण करण्याचे ठरविले. मंडळाची घटना तयार करून दिनांक ९ जानेवारी १९५० रोजी प.पू. श्रीधरस्वामींचा आशीर्वाद घेऊन श्री समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी "श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड" ही संस्था स्थापन करून कायद्यानुसार रजिस्टर्ड केली. "श्री समर्थांच्या कार्याचा, तत्वज्ञानाचा, वाङ्मयाचा प्रसार सर्वत्र करून श्री समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सर्व स्थानांचे नंदनवन करा, समर्थ तुमच्या पाठीशी आहेत " असा आशीर्वाद श्री श्रीधर स्वामींनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला. समर्थ सेवेचा आदर्श श्रीधर स्वामींनी घालून दिला होताच, त्या आदर्शा प्रमाणे मंडळाचे निस्पृह कार्यकर्ते सज्जनगडाचा काया पालट करण्या करीता झटू लागले.
निवास व्यवस्थेसाठी नोंद करून खोलीची चावी घ्यावी.
निवास, भोजनप्रसाद, चहा, नाष्टा, स्नानासाठी गरम पाणी ही सर्व व्यवस्था
श्री समर्थ सेवा मंडळातर्फे विनामूल्य केली जाते.
ऐच्छिक ‘देणगी सेवा’ मंडळाच्या कार्यालयात स्विकारली जाते व त्याची पावती दिली जाते.
'श्री समर्थ सेवा मंडळाचे' मुख्य कार्यालय आपण सज्जनगडाच्या पायऱ्या चढून सपाटीवर आल्यावर लगेचच डाव्या
हाताला आहे. आपल्या निवास व्यवस्थेसाठी तसेच अधिक माहितीसाठी तेथे संपर्क करावा.
श्रीसमर्थ सेवा मंडळाचे मुख्य कार्यालय सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत उघडे असते.
आपल्या आप्तांच्या नावे अभिषेक, अन्नदान इ. करता येते.
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am